STORYMIRROR

Vinita Kadam

Fantasy Others

4  

Vinita Kadam

Fantasy Others

ताटवे

ताटवे

1 min
498

नयनी पाहिले

मी स्वप्न गडे

पंख लागता मनी

गगन भरारी उडे...

       

मी कोण आता

मला न आठवे

पाहिले अगणित

रंगीत ताटवे

      नयनी पाहिले...


सोनसळी उन्हात

वाट निघाली न्हाऊन

रेशमी मखमल गेली

पावलास स्पर्शून

         नयनी पाहिले...


सुगंध श्वेत मोगऱ्याचा

दिगंतात दरवळी

खळखळून हसे फुलात

गोड गुलाबी कळी

         नयनी पाहिले...


केशरी टपोरा प्राजक्त

बहरे परसदारी

दर्शने मुग्ध होई

पूर्वेची ती सोनपरी

        नयनी पाहिले...


भ्रमर अवतीभवती

करी गुंजारव

पिपासू होई तो

मधुकर कमलासव

        नयनी पाहिले...


पोहोचले कोण्या गावा

मला न कळे

पाहती तव ताटवे

सुमनांचे मळे

       नयनी पाहिले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy