माझ्या आठवणींच्या विश्वात
माझ्या आठवणींच्या विश्वात
लाभेल अपार आनंद मला, तुझ्या त्या सहवासात
चल ना एकदा फिरायला, आठवणींच्या माझ्या विश्वात...
खेळेन बागडेन अन, मनमौजी बोलेन तुझ्यासवे
तू दूर राहण्याच्या तक्रारीत, भांडेणही तुझ्यासवे
नंतर मात्र गप्पांची शाळा, मांडेन तुझ्यासवे
माझ्यासोबत बागडायला, भांडायला अन बोलायला
चल ना एकदा फिरायला आठवणींच्या माझ्या विश्वात...
बुडून जाऊ एकदा आपल्या, आठवणींच्या भूतकाळात
गढून जाऊ एकदा आपल्या, स्वप्नांच्या भविष्यकाळात
क्षण अगम्य जगू त्या, धुंद वर्तमानकाळात
माझ्या भूतकाळात विरून जायला, अन् भविष्यात हरवून जायला
चल ना एकदा फिरायला आठवणींच्या माझ्या विश्वात...