आला श्रावण आला
आला श्रावण आला
1 min
720
शांत तरूंवर बोल बोलण्या
प्रेमयुगुलांशी हळूच खेळण्या
तोरण बांधूनी गडद ढगांचे
आला श्रावण आला
जलथेंबानी गुंजारव करण्या
प्रियकराच्या प्रीतीचे आर्जव करण्या
सुंदर मखमली रंग घेऊनी
आला श्रावण आला
तम अनामिक अंबरी येतो घेऊन
चिंब चिंब तन जातो भिजवून
ओढ घेऊन जन्मांतरीची
आला श्रावण आला
क्षणात विरुनी पुन्हा बरसण्या
उंच चलांवर सूर गवसण्या
इंद्रधनूचे रंग घेऊनी
आला श्रावण आला
क्षणात येतो क्षणात जातो
पळभर येऊन हसतो गातो
आयुष्याचे गणित सांगण्या
आला श्रावण आला
