STORYMIRROR

Deepti Naykodi

Others

4  

Deepti Naykodi

Others

मला भेटलेली 'ती'

मला भेटलेली 'ती'

1 min
451

ती, त्या वाटेवर मला अशीच अचानक, अगदी सहज भेटली ती.

पण एका वेगळ्या चेहर्‍यात आणि अनेक रंगात रंगलेली ती.


कधी माझे आनंदाचे क्षण वेचणारी

तर कधी माझ्या दुःखांना वाट करुन देणारी ती.

माझ्या मनातल्या प्रत्येक भावनेला

तिच्या सुंदर अक्षरांनी सजवणारी ती.


कधी थकलेल्या, दमलेल्या मला

तिच्या कवितेच्या दुनियेत क्षणभर विसावा देणारी ती.

वाटले कधी एकटे, एकाकी मला

तर तिच्या हळुवार शब्दांच्या कुशीत घेणारी ती.


स्वतःचे आयुष्य त्या पांढर्‍या शु्भ्र कागदावर उभारताना

माझे आयुष्य मात्र सप्तरंगांनी खुलवणारी ती.

माझेच प्रतिबिंब आता मला नव्याने दाखवणारा

तो आरसाच जणू बनली "माझी कविता" ती.


Rate this content
Log in