Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Fantasy

4.4  

Sarika Jinturkar

Fantasy

प्रिय आरसा

प्रिय आरसा

2 mins
245


स्वच्छ नितळ पारदर्शी  

दाखवितो प्रतिमा,  

खुलवितो आनंद मुखाचा 

सांगतो आपल्याला

आदर्श जीवन हे, आनंदाने जगत

सदैव हसत राहण्याचा  


लपत नाही काही त्यासमोर सगळं काही समोर असतं... कधी उदासीनता चेहऱ्यावरची तर कधी त्यात स्मित दिसतं  


देहा पलीकडे जाऊन 

मनाचं सौंदर्य टिपणारा 

हसण्या पलीकडले लपलेले अश्रू वेचणारा  

खोटं सांगायला जगात लोक आहेतच की... पण अगदी आहे तसं तुमचं खरं अस्तित्व तुम्हाला दाखवणारा  


आपण हसलो तर तोही हसतो 

आपण रडताना दुखी तो ही होतो

 निर्जीव असतो जरी आरसा 

 सुखदुःखात खरा चेहरा भासतो हासरा 

साथ देतो जणू सख्यासारखा


 समरस होई आपल्या सोबत

 दाखवतो कधी बालपण 

तर कधी प्रौढ चेहरा


 तुला बघितल्या शिवाय कुणाचेच मन राहवत नाही

असो तो मग लहान किंवा मोठा 

तुझ्यामुळे न्याहाळते 

रूप आमचे क्षणोक्षणी 

तुझ्यामुळे नाही राहावे लागत कोणावरी अवलंबूनी  


नेहमी सत्य दर्शविणारा स्वतःला स्वतःची

 भेट घालून देणारा एक खरा मित्र

 स्वतःवरच प्रेम करायला भाग पाडतो

 किती आघात झाले तरी नाही सोडत पूर्णत्वाचा गुणधर्म  


अनेकांना हसवतो प्रसंगी रडतोस

 समोर जे, ते नयनी पाहतो 

 खऱ्याची कास धरतो

उपयोग होतो तुझा शांत

 करण्या लहान बाळाला 

दिसणारे आपले गोजिरे रूप बघताच 

हर्ष होई रडणाऱ्या जीवाला  


एकांतात भरून आलेलं 

 मन मोकळं तुझ्याजवळ करता येतं

जे इतरांना कळत नाही ते तुला नकळत समजतं  

 

परिक्षा असो वा मुलाखत तिथे जाण्यापूर्वी 

संवाद साधतात सगळेच तुझ्याशी  

तुझ्यामुळे आत्मविश्वास वाढतो

 तू खूप काही शिकवतो अन् जाणीव 

करून देतो स्वअस्तीत्वाची 

 कोणी नसता, जवळचा तू असा 

भांबावलेल्या क्षणी साथ तुझीच मग मना


 आभासी या जीवनातील खेळ रंगवतो  

वास्तव्याच्या जाणिवेचे भान करून देतो  


आयुष्य... हा आरसाच दाखवतो 

प्रतिमा आपल्या विचारांची 

आपले विचार कसे आहेत यावर

 पुढे चालते वाटचाल जीवनाची


आरसा कर्माचा आपल्या सदैव असावा साफ

तेव्हाच कुठे परमात्मा ही करेल माफ


 लोक म्हणतात आपली प्रतिमा समाजात असते पण मला वाटते आपले खरे प्रतिबिंब आरसा दाखवते  

आरसाच आपल्याला स्वतःची स्वतःला नवी ओळख करून देते....बरोबर ना... 🙏😊 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy