STORYMIRROR

Suchita Kulkarni

Fantasy

3  

Suchita Kulkarni

Fantasy

प्रेमवेडी राधा

प्रेमवेडी राधा

1 min
13.7K


प्रेमवेडी राधा मी
तू कृष्ण सखा सावळा
बासरीचे सूर कानी पडता
भुरळ पडते मनाला

रूप तुझे सावळ्या रे
वेडी राधा भाळली
पाहता तुला गुंतले
मनगीत ओठी गायली

तूच माझा प्राण कान्हा
प्रेमात राधा नाहली
जीवनाचे गीत गाते
कृष्णमय राधा जाहली

रास खेळे चढला रंग
राधा संगे नाचे श्रीरंग
सूर बासरीचे ऐकून सारे
राधा बावरी झाली कृष्णात गुंग

 

प्राण माझा श्वास तू रे
जळी स्थळी श्रीकृष्ण भासे
सावळ्याचे रूप पाहून
लाजून राधा गालात हासे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy