दगा
दगा
तुझ्या वाटा ओल्या झाल्या
माझ्या अश्रूंनी
दिले वचने खोटे झाले
तुझ्या कृपेनी
समजावने माझे रोज असते
माझे माझ्या मनाला
कधीच ऐकत नाही काही सुचत नाही
तुझ्या शिवाय या दिलाला
तुझ्या वाटेवर रमतो क्षणभर
सखे तुझी आस लागे जीवाला
अश्रू पुसूण पुन्हा हसून
सखे कसा बसा लागतो मी जगायला
कठीण आहे अवघड नाही
तुझ्या शिवाय जगायला
अरे तुझ प्रेम नाही तू नाही
मग मी देवदास बनायच कशाला
तुझ्या आठवणीचा
ऋणी मी कायम
तू दिला दगा
मी ठेवला संयम
पश्चाताप करून
सखे काय मिळतं तुला
लक्षात ठेव मी वऱ्हाड प्रेमाचा
तू दिला दगा