STORYMIRROR

Sagar Laholkar

Action Fantasy Inspirational

4  

Sagar Laholkar

Action Fantasy Inspirational

पार्लर

पार्लर

1 min
14

पार्लर

पार्लरला जाऊन थोबाड रंगवून,
बाहेर तू कुठे मटकते,
अग तोंडाला लावले केमिकल  
उद्या त्याने कॅन्सर होते

फेअरनेस क्रिमच्या नादात पोरी
तू चुना स्वतःलाच लावते
क्षणिक त्या ग्लोच्या नादात 
तुझी स्किन पार आतून जळते

पावडरचा थर आणि लिपस्टिकचा डार्क शेड
चेहरा तुझा चमकावतो
पण घामाची एक सुटली धार की
भुतही तुला बघून पळतो

केमिकलचे हे लावून लेप
फक्त नवऱ्याच्या पैशांचा भुगा होतो,
आरोग्य धोक्यात घालून तुझे
फक्त पार्लरवाल्यांचा धंदा होतो

सोडून दे आता, सखे हा कृत्रिम थाट,
अन् खोटा मुखवटा हा बाजूला सार,
घरच्याच नैसर्गिक उपायांनी
रूप तुझे निखार
               ✍️ _______सागर लाहोळकार
                                   ८९७५१३९६०४ 
                                        अकोला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action