STORYMIRROR

Sagar Laholkar

Drama Action Inspirational

4  

Sagar Laholkar

Drama Action Inspirational

शेवटचा लढा

शेवटचा लढा

1 min
0

निवडणूक झाली,
गॅस पेट्रोलचे भाव वाढले,
अंधभक्त म्हणाले,
अच्छे दिन आले!

मीडिया विकली,
निवडणूक आयोग विकले
सत्याचे गळे इथे
भरचौकात आवळले.

हातात डिग्री असूनही
तरुण आज वणवण भटकतोय,
बेरोजगारीच्या फासावर
स्वप्नांचा गळा रोज घोटतोय

'भजी तळा' सांगणारे
सत्तेच्या खुर्चीत बसले,
अन हक्काच्या नोकरीसाठी
सर्व तरुण फसले

घरातला गॅस आता
शोभेची वस्तू झाली,
महागाईची झळ
गरिबाच्या थेट ताटापर्यंत आली

तेल-डाळीचे भाव बघून
सर्वसामान्य माणूस हादरला,
पण जाहिरातींच्या झगमगाटात
विकास मात्र सावरला

व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीत
रोज खोटं पेरलं जातंय
अंधभक्तीच्या नादात
रोज देश अधोगतीकडे जातंय

जागे व्हा जनता
आता तरी डोळे उघडा
तुमच्या हक्काच्या भाकरीसाठी
आता शेवटचा लढा उभारा.

✍️ ______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                          अकोला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama