STORYMIRROR

Sagar Laholkar

Action Inspirational Others

4  

Sagar Laholkar

Action Inspirational Others

लोकशाही

लोकशाही

1 min
9

हरलो आम्ही नाही
जिंकले तुम्ही नाही
सत्तेचा केला गैरवापर
जनता माफ करणार नाही 

लाजा वाटू द्या जरा 
लोकशाहीचे लचके तोडताना 
सर्व जनतेने पाहिले 
तुम्ही सत्तेसाठी नग्न होताना 

वाचवू लोकशाही आम्ही 
जन्म हा व्यर्थ न जाई 
अन्याय विरूद्ध लढताना 
आमची मान झुकणार नाही 

बलिदान दिले ज्यांनी स्वातंत्र्यासाठी
मिडीयाने थोडा विचार करावा
मिळाले स्वातंत्र्य असेच नाही
रक्ताचा इतिहास त्यांनी स्मरावा

शेवटी विजय सत्याचा होतो 
हे विसरू नये कोणी 
उजळेल नवी पहाट 
पुन्हा मजबूत ही लोकशाही

✍️ _____सागर लाहोळकार
               ८९७५१३९६०४ 
                     अकोला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action