STORYMIRROR

Sagar Laholkar

Drama Action Thriller

4  

Sagar Laholkar

Drama Action Thriller

संविधानाचा हिशोब

संविधानाचा हिशोब

1 min
5

आमदार फुटतो, पक्ष फुटतो
भुटतात इथे पेपर
महागाई चालली वाढत
काय करणार हो लेबर

मन की बात सांगतो, रूपया घसरतो
स्वतःलाच विश्वगुरू म्हणतो
विदेश निती न खाली माती
हा ट्रम्प पुढे सलेंडर होतो

मिडिया विकली, देश विकला
विकली इथे इमानदारी
पैश्यासाठी झाले सर्व लाचार
विसरले आपली जबाबदारी

बलिदान दिले स्वातंत्र्य मिळाले
या दिवसांसाठी नाही
लोकशाहीचा तुम्ही गळा घोटताना
थोडीशी लाज वाटत नाही

जय श्रीराम म्हणवता,
धर्मा धर्मात भांडवता
अजून किती मुर्ख
समजाल आम्हाला

अहो अती केली तुम्ही,
मती नाही गेली आमची
आता सत्तेतून खाली खेचण्याची
वेळ आली तुमची

उठाव होईल, क्रांती होईल
पुन्हा नव्याने लोकशाही बहरील
तुमच्या सगळ्यांचा हिशोब
सविधांनानेच चुकता करून
हा देश पुन्हा नव्याने उभा राहील!!!
✍️ _______सागर लाहोळकार
                    ८९७५१३९६०४
                          अकोला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama