चंद्र
चंद्र
🌛🌟✨⚡
दिवसभर तप्त झालेल्या वसुंधरेला
शितल किरणांनी अन्
मायेनी गोंजारतो ☺️
प्रकाश फुले घेऊन ओंजळीत शितल, सुखद चांदण्या
सह रात्रही सांभाळतो
युगायुगांची अंधार यात्रा अगदी सहजपणे करून धडपडणार्या कित्येक स्वप्नांना चांदण्यांनी
भरलेल देखण आकाश ही देतो
पौर्णिमेला कलेकलेने वाढत
पूर्णत्वाला जाऊन
कांचनवर्ण लेऊनी अन् रुपेरी साज घेऊनी निळ्या
नभी चमकतो
धवल, देखणा दूरवर लखलखणारा
काळोखात आपला ठसा उमटविणारा
शुभ्र नटलेल्या लुकलुकणाऱ्या चांदण्यात
किती उठून दिसतो...🌟✨
सौंदर्य तुझे पाहून सार्या तारका पडतात तुझ्या प्रेमात
तुझं मन जिंकण्या जणू स्पर्धाच लागते सार्यात
कधी रमतो गाण्यात
कधी गोष्टीच्या पानात
निथळत किनारी करीत लपंडाव
कधी असतो साथीला तिच्या ना त्याच्या विलक्षण भेटीला
कधी आठवण बनून प्रेमाची साक्ष, कधी एक आस
कधीकधी तर शोध ही होतात तुझ्यावर काही खास ☺️
दूरवर आसमंतात
दडलेला असला तरी सारेजण तुला भरभरून पाहतात
शितलतेचा शोध घेत तुला
शब्द पुष्पांनी सजवतात✨
तुझ्या चैतन्याला उपमा नाही चांदण्यात लख्ख निखळतात दिशा दाही ✨✨
प्रतिपदेचा ची कोर
एक आशेचा किरण⚡️
तूच शिकवतो जगण्याचा अर्थ
काळोखात लख्ख प्रकाश..
असे का...
तुझ्या जीवनात व्यर्थ
अपयशानंतर यश यशानंतर
कधी अपयश
ह्यासानंतर वृद्धी वृद्धी
नंतर कधी ह्रास
हे जीवनाचे गुपित
मानवाला समजवण्यासाठी
अमावशेने असतो का तू शापित
पौर्णिमेच्या रूपात लख्ख उजळतो अन्
रूसला की अमावशेला गुडूप होऊन जातो
पृथ्वीभोवती फिरताना आपलं प्रतिबिंब सोडून जातो
शितल प्रकाश तुझा मनाला प्रफुल्लित करतो 🌙
चंद्र तारकांच्या खेळात🌙🌟
कधी कधी तर ओजस्वी रूप पाहून तुझे आम्हीही दुःख विसरतो😊
आज वाटलं तुझ्याकडे
कधीकधी का... रोजच पहावं
थोडं का होईना तुझ्याशी हितगुज करावं
वाटल मग आवरावे मोहला..का...? थांबावे त्या ढगाला☁️
आज तुला न्याहाळतांना
पाहीला तुटता तारा
गोड मधुर अंगाई गाई
हा रात्रीचा गारगार वारा
ढगाआड लपून चंद्रा तुला आज हसताना पाहिले
ढग आडवे येती जे शब्द सुचले ते मग मी लिहिले
चंद्राच्या शीतल प्रकाशात चांदण्यांनी
जणू लपंडाव मांडला
मन प्रफुल्लित करून गेला बघतांना आसमंत हा सारा
