माझ्या मना ऐक ना....
माझ्या मना ऐक ना....
मन कधी आड कधी विहीर..
कधी नदी कधी आभाळ..
वसत तयात माझं स्वरुप ते वेगळ..
जरासा भाव अनोळखी तो
चटका जिव्हारी लागतो
मन रडत अन अश्रू डोळा येतो
माझ न मनाचं नात असच आहे.. मी जगते प्राणते मनात माझे श्वास आहेत..
आशा उराशी दाटल्या कितिश्या
जाहली गर्दी भावनांची जराशी
जाणुनी घे कल्लोळ हा मनीचा
असा का छंद तुला मानतल लिहिण्याचा ?
सांग ना मना काय आहे तुझ्या माझ्यात
मनाशी मनाचे काय बोलू सगळेच त्याला ठावे
माझ्या ही आधी कळे त्याला भाव सारे,...
नेहमीच तुझ्या दुखण्याला मी कारणी भूत आहे. निर्णयाची यादी लादली मी तुझ्यावर तुही कणखर आहे सखी म्हणून केली सरबत्ती.. तरीही आज वाटते विचारवस तुला काय मी तुझ्यावर अन्याय तर नही न केला.. माझ्या हृदयातल्या आतील आवाज ऐकायला मी उशीर तर नही ना केला.. सांगत होते तू नेहमीच मला वाट बिकट तरी सामर्थ्याचीपरीक्षा असे खास तू केलीस च बरोबरी माझी आज ही करत आहेस तुझ्या या साथी ला काय म्हणू मी..
मन आणी बुद्धी ची सांगड नाही घालता येत मला हो ना?
जे पाहिजे तेच सोडून,जे भेटल त्यात समाधानी जगले ..
मन आहेस ना तू दुखवल आसेल ही मी तुला .. हो ना ....
खुप त्रास होतो मनाविरुद्ध वागलो की पण तू झ कधी ऐकलेच नाही..
आज जरा उसंत मिळाली तुझ्याशी संवाद साधू तसे रोजच बोलतो पण आज जरा तुझे बोलू..
लहानपणी ची सय असं मनात सल
होतीस तू झेप माझी नसे पंखात बळ
लाचार बालपण अधार वड नसे कोण
दिसे जिथे तिथे माघार पावलांची हार मनीची
सोसली तूच ती झेप तरीही घेतसे मन
वेगळ्या वाटेवरी वेगळ्या उमेदीने मना तू
केलेस मलाच पुन्हा उभे या जगी
क्षेत्र कोणत ही असो बळकट पाठिंबा फक्त तू
थाप नसे इतर कोणाची मज तुझी साथ टिकली कायमची
कितिदा तुला मी मला तू संभलले तरी
तुझ्या विना या जगी दुसर कोणी च मला समजल नाही ..
मन खंभीर तरी बेड्या असती जन्मभर च्या पायी
स्वप्न रेखाटायला तरी केली साथ तुच माझी
देशील असच शेवट पर्यंत साथ माझी..
निर्णायक क्षणी आणी शेवटी ही मन माझ माझ विश्व
इथे हसते मी मनसोक्त इथे उडते मनीच्या आकाशी
मनीच्या क्षितिजावर कोरते चित्र भाव मनीचेच
बुद्धि ही होते साथी मग सत्ता असे मनीच्या हाती जर
आहेसच तू दुखावले जरी मी तुला तरी तुझ्याशिवाय कुठे जाऊ मना...
अभार तरी कितिदा मानू नकोस लावुन घेऊ मनाला तूच समजावते मला ही..
अस हे माझं मन माझं आधारवड.. 💞

