STORYMIRROR

Shashikant Shandile

Fantasy

3  

Shashikant Shandile

Fantasy

दुविधा आहे देवा तू आहेस की

दुविधा आहे देवा तू आहेस की

1 min
13.9K


दुविधा आहे देवा तू आहेस की नाही

सुविधा आहे तुला, गरिबास अन्न नाही

उपाशी मरतो माणूस। तुला लाडूचा भोग आहे

म्हणाया तुझं मंदिर मंदिरात तूच नाही

बनवून माणसाला अन्याय का हा केला

देतांना ताठ हाती समभाग त्यात नाही

सर्वोपरी जरी कर्म, हाताला काम दे तू

कुणाला फक्त डोळे कुणाला हात नाही

तुच सृष्टी सारी घडवुनी दोषी ठरला

कुणाला बंगला गाडी, कुणाला घर नाही

बाळाला माय बाप सोडे ना रस्त्यावर

जन्म देउनी मुलाला ठरला तू बाप नाही

का मंदिरात जाऊ विनवू तुला रे मी

फळ माझ्या कर्माचे हे वाकणार मी नाही

माया तुझी तयावर देती जे सोने नाणे

दार आता तुझ्या घरचा ओलांडणार नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy