STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Tragedy

2  

SHASHIKANT SHANDILE

Tragedy

जिंदगीचे काय साले खेळ झाले....

जिंदगीचे काय साले खेळ झाले....

1 min
116

स्पंदने हृदयात आता पूर्ववत धडधडत नाही,

वेदना संवेदना हृद्यातली परवडत नाही!


स्वार्थ जपणाऱ्या मनांना जा म्हणावं दूर व्हावं,

संपलेला हा खिलाडी फायद्याचा पडत नाही!


वास्तवाची राख घेऊन हा स्मशानी चाललो मी,

प्रश्न पडले जर निरुत्तर चित्तही फडफडत नाही!


या चितेवर एक काडी फेकण्याचा त्रास घ्यावा,

तेल तूप लावून माझा देह काही जडत नाही!


बघ 'शशी' या जिंदगीचे काय साले खेळ आहे,

कर भले अन दे लुटा पण आवडीचे घडत नाही!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy