तिच्या डोळ्यातला पाऊस
तिच्या डोळ्यातला पाऊस


तिच्या डोळ्यांच्या सांदीतून
पाऊस खळकन ओघळला
हातावर गोंदलेल्या "त्या"
नावावर पुन्हा एकदा भाळला.
सचैल नाहू घातले नाव त्याने
जरा शांत झाले चार घाव जुने
हात जरासा हलला शहाऱ्याने
गाठला तळ मनाचा..ओघळाने.
आत साचले आशेचे चार ढग
उर धपापला आणि वाढली धग
भरुन आले चौफेर व्यापले जग
बाहेरच्या पावसानेही धरला वेग.
कोसळती धारा पुन्हा एकदा नाहली
दोन पावसांची मने आज एक जाहली
विझली धग होती आजवर जी साहली
डोळ्याची कड आणि उगाच ओलावली.