पेरणी
पेरणी
1 min
92
किती पेरली ग तासं,तासी लागलं व शेतं
शेती उगवलं व पिकं, पिकं आलं भरघोस।।धृ।।
भरघोस दाळदान ,दाळदान कणग्यात
कणग्या व उतरंड ,उतरंड घरोघर ।।१।।
घरोघरी दिवावात ,दिवावाती देवादिकं
देवादिका आशिर्वाद, आशिर्वाद सजिवास।।२।।
सजीवा पुरण पोळी, पुरण पोळी सुग्रास
सुग्रास ती खानावळ, खानावळ धुपवात।।३।।
धुपवात अन्नपुर्ण ,अन्नपुर्ण पुर्णब्रम्ह
पुर्णब्रम्ह जल देवा,देवा राशीच्या दे;रास।।४।।