Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रतिक्षा ...

Romance Tragedy

4.8  

प्रतिक्षा ...

Romance Tragedy

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर...

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर...

1 min
316


आली पावसाची सर, उरी एक हुरहूर ।

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर ।।


आला थेंब अंगावरी, गेला विरून क्षणात ।

काहीही ना बोलला तो आज माझिया कानांत ।।

कसा थेंबानंही आज त्याचा बदलला नूर ।

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर ।।


सुरु झाली रिमझिम, आनंदली हि धरती ।

नाही पडला आनंदाचा टिपूसही मजवरती ।।

कुठं हरवून गेला माझ्या जीवनाचा सूर ।

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर ।।


सरीवर आली सर, चिंब भिजलं हे जग ।

परि माझिया अंतरी असे शुष्कतेची धग ।।

चिंब ओल्या आसवांनी मन जाळल्याचा धूर ।

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर ।।


आज अशा पावसानं जग प्रफुल्लित सारं ।

माझ्या नाशिबाच गाणं त्या साऱ्याहून न्यारं ।।

आता डोळां माझिया त्या फक्त आसवांचा पूर ।

तुझ्या आठवांनी आज मनी दाटले काहूर ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance