Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रतिक्षा ...

Romance Tragedy

4.7  

प्रतिक्षा ...

Romance Tragedy

प्रेम - हरलेलं, बुडलेलं

प्रेम - हरलेलं, बुडलेलं

1 min
364


आज सांजवेळी पुन्हा मजला तुझी आठवण आली ।

अन बुडत्या सूर्यानं मग बुडल्या प्रेमाची साक्ष दिली ।।


अगदी त्या दिवसासारखी आज पुनः सांज खुलली होती ।

आपल्या त्या प्रेमाला तीही केव्हातरी भुलली होती ।।


घरट्याकडे परतणारा पक्षीही आज रेंगाळत होता ।

कारण, आपल्या प्रेमाचा प्रवास त्यानं जवळून पहिला होता ।।


उनाड वारा शांत होता, रातकिड्यानेही नाही अडवलं ।

हरलेल्या माझ्या प्रेमानं आज तर साऱ्यांनाच रडवलं ।। 


काळरातीने आता नाभाचा ताबा हाती घेतलेला ।

शब्दन्शब्द स्मरला मला, माझ्या मनी तू ओतलेला ।।


आकाशाचा चन्द्रमाही लपंडाव रे खेळत होता ।

खोट्या प्रेमाची साक्ष देऊन मजपासून तो पळत होता ।।


गर्द काळी ती रात मजला आज एकच पुसून गेली ।

का झुरतेस त्याच्यासाठी, ज्यानं तुझी आसवंही चोरून नेली ??? 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance