Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

प्रतिक्षा ...

Tragedy Others

4.8  

प्रतिक्षा ...

Tragedy Others

पावसातलं नातं

पावसातलं नातं

1 min
709


आज पुन्हा तेव्हासारखाच पाऊस छान झरत होता ,

तिच्या आठवांचा वर्षाव त्याच्या मनी करत होता ।


आज बरसत असलेली एक न एक पावसाची सर ,

तिची आठवण जपून होती मनात अगदी खोलवर ।


तिलाही आज पावसाचं वागणं काही औरच वाटलं ,

त्याच्या सहवासातल्या क्षणांचं मनी धुकं दाटलं ।


प्रत्येक थेंबानं साक्ष दिली एका गोड क्षणाची ,

पुन्हा पावसानंच ऐकून घेतली व्यथा तिच्या मनाची ।


तो सारखा म्हणत होता तिनंच तर सारं सोडलं होतं ,

अन प्रेमाचं नाजूक नातं तीनच तर तोडलं होतं ।


ती म्हणाली मनोमन तुला कधीच का नाही कळलं ?

सारं घडत असताना माझं काळीज किती जळलं ?


ह्याच पावसानं एक दिवस त्यांचं नातं जोडलं होतं ,

आज त्या दोहोंतलं अंतर अधिकच वाढलं होतं ,


विरहाचा अग्नी त्यांना मनोमन जाळत होता ,

आज त्यांच्या दुःखात जणू मेघच आसवं गाळत होता ।


Rate this content
Log in