STORYMIRROR

प्रतिक्षा कदम

Tragedy Fantasy

4  

प्रतिक्षा कदम

Tragedy Fantasy

नशिबीची उन्हं

नशिबीची उन्हं

1 min
614

नाही हसविलं कुणी, नाही रिझविलं मन।

माझ्या नशिबी सदा का अशी कोरडीच उन्हं?


हाक दिली दूरवर, साद कुणी ना घातली।

माझ्या ओंजळीत होती कुणी दुःखेच ओतली।।

हात पडता फुलावरी, चावा घेतला काट्यानं।

माझ्या नशिबी सदा का अशी कोरडीच उन्हं?


प्रेमाचाही झरा आता माझ्या दुरून वाहतो।

विरलेल्या माझ्या मना खिजवूनी तो पाहतो।।

आसवांच्या पाण्यानं का कधी भागते तहान?

माझ्या नशिबी सदा का अशी कोरडीच उन्हं?


नित्यनेमानं इथे हो ठेच काळजासी लागे।

कुणी विणले मजसाठी नैराश्याचे दृढ धागे?

रोज आसवांची रात, नाही पाहिलं चांदणं।

माझ्या नशिबी सदा का अशी कोरडीच उन्हं?


नाही कुणाचा आसरा, कधी लाभली ना माया।

विरहाच्या वणव्यात माझी करपली काया।।

कसं भोगलंय मनानं जितेपणीचं मरण?

माझ्या नशिबी सदा का अशी कोरडीच उन्हं?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy