STORYMIRROR

प्रतिक्षा कदम

Tragedy Inspirational

4.7  

प्रतिक्षा कदम

Tragedy Inspirational

आता मला सवय झालीय ...

आता मला सवय झालीय ...

1 min
519


आता मला सवय झालीय तुझ्याकडून फसण्याची ,

सल असलं मनात तरी खदखदून हसण्याची ।

ज्याची आस वाटते मनी, तेच आपलं नसण्याची ,

अन, डाव जीवनाचा हरुनही समाधानी दिसण्याची ।।


अंतरीचा आक्रोश दिसतो शांत आता निजलेला ,

प्रखर तेवणारा दिवाही मंद होऊनी विझलेला ।

वणव्यात होरपळूनही मी आसवांत न भिजलेला ,

अन दुःखाचाही क्षण आज मी सुखांसवे मोजलेला ।।


निराशा जीवनात माझ्या घर करुनी आता राहिलेली ,

न मिळाली भेट मज ती स्वप्नी मी सदा पाहिलेली ।

त्याचसाठी जीवनातली दुःखे सारी साहिलेली ,

अन आयुष्याची पूंजी सारी त्याच्याकरिता वाहिलेली ।।


अजूनही या निष्प्रभ मनाला उमेदीची आशा असे ,

गर्द धुक्यातही प्रकाशाचा कवडसा तो मज भासे ।

आठवणींच्या हिंदोळ्यावर सुख जरी का झुलत नसे ,

परि भविष्याचा इंद्रधनू मजसी खुललेला दिसे ।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy