STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Abstract Tragedy Others

2  

SHASHIKANT SHANDILE

Abstract Tragedy Others

का आंधळा तरी तू

का आंधळा तरी तू

1 min
127

या सागरी कितीसा पाणी भरून आहे

पण वाटण्यास पाणी तोही अडून आहे


पाहून माणसांची बेकार लालसा ही

त्या सागरात पाणी खारे बनून आहे


मोजून दाम घेतो माणूस आज पाणी

काही हिशोब आता बाकी अजून आहे


विध्वंस जंगलांचा सोचून काय केला

अंगार उष्णतेची पुन्हा दबून आहे


थोडे करून काही फेडून पाप घेऊ

कारण निसर्ग आता कंबर कसून आहे


काही जबाबदाऱ्या आहेत माणसांच्या

पण धूळ मी पणाची भारी चढून आहे


बघ तापतो 'शशी' ही दरसाल केवढा हा

का आंधळा तरी तू सारे बघून आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract