सदा सारखे मी पुढे हात केले ......
सदा सारखे मी पुढे हात केले ......
1 min
23
सदा सारखे मी पुढे हात केले,
नफा पाहुनी ना कुठे घात केले!
कुणाला कळावे कुणाच्या मनाचे,
जरा भाव मी व्यक्त शब्दात केले!
कुणाला म्हणावे अता आपले हो,
इथे आपल्यांनीच आघात केले!
लिहावे मनाचे भले कागदावर,
मुखी बोलणे बंद सर्वात केले!
बरा मी बरा आणि 'एकांत' माझा,
कपाती सुरू मीच नात्यात केले!
