STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Others

3  

SHASHIKANT SHANDILE

Others

सांत्वनेने भाळतो नुसता शशी हा……..

सांत्वनेने भाळतो नुसता शशी हा……..

1 min
260

का कुणाचा देखणा आभास व्हावा,

मी म्हणूनी का कुणाला त्रास व्हावा!


संपवूनी वेळ असता दोष काही,

वाटते माझाच मी अभ्यास व्हावा!


मानतो झाल्या चुका माझ्याच आता,

पण असाही काय माझा ऱ्हास व्हावा!


मी परी जपलीत नाती गोडव्याने,

वाटले मीही कुणाचा श्वास व्हावा!


पाहिले स्वप्नात मीही चांद तारे,

भाळणारा का असा वनवास व्हावा!


मी लिहावे हर्ष त्याचे दुःख व्हावे

हा कवी इतकाही का बदमाश व्हावा!


सांत्वनेने भाळतो नुसता शशी हा,

घात स्वप्नांचा जरी हमखास व्हावा!


Rate this content
Log in