STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Others

4  

SHASHIKANT SHANDILE

Others

आयुष्य घे पणाला

आयुष्य घे पणाला

1 min
274

देऊ नको पुरावे आता तरी कुणाला

मानून घे मना तू हारून वास्तवाला

खोटे परी दिखावे असतील या जगाचे

सारेच आपले ते मग राग हा कशाला


दाटून उर येता दे धीर आसवांना

दाऊ नको निराशा किंचितही जगाला

हसतील सारखे हे समजून कोण घेतो

धावून फौज येते दे भार तू खिशाला

जग वेगळे तुझे हे कळणार ना तयांना

तू एकटाच आता आहेस सोबतीला


तोडून बांध सारे कर वाट मोकळी तू

खेचून घे जरासा जवळीक सागराला

एकांत आवडीचा मिळणार ना कधीही

जिंकून दाखवाया आयुष्य घे पणाला


Rate this content
Log in