STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Others

3  

SHASHIKANT SHANDILE

Others

एकांत माझा ( गजल-काव्य)

एकांत माझा ( गजल-काव्य)

1 min
33

मी मनी माझ्यापरी स्वीकारला एकांत माझा,

अन मतीने सारखा फेटाळला एकांत माझा !


का कुण्या खांद्यावरी ठेऊन डोके मी रडावे,

आज माझ्या हुंदक्यांना भाळला एकांत माझा!


व्यर्थचा आधार घेता का मना दुखवून घेऊ,

सोबतीला फक्त माझ्या राहला एकांत माझा!


पालवी फुलली नव्याने वाळलेल्या लाकडाला,

अन कुणाच्या सोबतीने संपला एकांत माझा!


काय झाले रे शशी 'एकांत' हा हसतो कशाला?

शांत होऊन अंतरी मग लाजला एकांत माझा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन