STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Children Stories

3  

SHASHIKANT SHANDILE

Children Stories

बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही

बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही

1 min
464

पाण्यात कागदाची ती नाव आज नाही,

गल्लीत टायरांची ती धाव आज नाही!

 

झाले जणू असावे घायाळ खेळ सारे,

भांडून मागणारे ते डाव आज नाही!

 

कोंडून ठेवलेले भिंतीत लेकरांना,

मैदान लाभलेले ते गाव आज नाही!

 

चिंद्या कितीक झाल्या फाडून कापडाच्या,

लपण्यास आवडीचा तो ठाव आज नाही!

 

बेकार भेटला हा एकांत लेकरांना,

बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही!


साहित्याला गुण द्या
लॉग इन