बलात्कार झालेल्या पीडितेची व्यथा
बलात्कार झालेल्या पीडितेची व्यथा
जगत होते ना मी माझं आयुष्य सुखात राहत होते ना खुश,
नव्हते गेले कधी कुणाच्या वाट्याला मग काय केली मी
अशी चूक?...
की अश्या यातना याव्या माझ्या देही
आणि मनानं ही बोलावं का घेतलास स्त्री जन्म त्या
मायेच्या उदरी...
त्या माणसाच्या रुपात असलेल्या जनावरानं माझ्या शरीराचे
लचके तोडताना एकच प्रश्न मनात आला की खरचं का?
ह्याने स्त्रीच्या पोटी जन्म घेतला...
नाही का? दिसली त्याला माझ्यात त्याची बहीण
नाही का? दिसली त्याला माझ्यात त्याची आई
नाही का? दिसली त्याला माझ्यात एक निरागस स्त्री
आणि नाही का? दिसली त्याला माझ्यात रोज ज्या देवी समोर
हात 🙏जोडतो ती देवी...
एका क्षणात संपवली सर्व माझी स्वप्न, केले माझं आयुष्य
उध्वस्त असं वाटतं घ्यावं धारधार शस्त्र आणि कापावं ह्या
हैवानाला...
पण ना राहिली तेवढी ऊर्जा ना राहिली तेवढी ताकत..
पण एकच विनंती आहे🙏 न्यायदेवतेकडे सोडू नको त्या
नराधमाला आणि अशी भयंकर शिक्षा दे की भीती वाटेल
पुन्हा कोणाला हे कृत्य करायला..
