तिच दुखणं
तिच दुखणं


तिच दुखणं असतं तिच्या पाशीच
ति मात्र राहते गबाळी तशीच
ति नसते चारचौघात मिरवण्यासारखी
कळते ज्याला तो खरा रत्नपारखी
दाखवाव म्हटलं तरी उगाच करते
म्हणणारे बरेच आजूबाजूला तिच्या
न दाखवता अगांवर बरेच काढते
भाळतात फक्त कामाच्या जादूला तिच्या
मनात विचारांच वादळ उठले तरी
ऐकणार कोण नाही भेटत तिला
भावनांना दाबून ठेवताना मनात
कल्लोळ विचारांचा सोसावा लागतो तिला
तिच स्वतःच अस्तित्व हरवलेले
आता नाही शोधत ती कधी
मांडलेला डाव सावरत ती
संसारात मुरवून घेते ती कधी