STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

3  

Savita Kale

Tragedy

अस्मिता

अस्मिता

1 min
116

मनातल्या भावनांना

पंख तुझ्या फुटू दे

घुसमट जुनी तुझी

आता तरी मिटू दे।। 


अस्मितेवर हल्ला तुझ्या

युगेयुगे करतील

भ्याड लोक सारे हे

अस्तित्व तुझे जाळतील।। 


पाय ओढणारी अशी

खेकड्याची जुनी जात

ठेचून अशा खेकड्यांना

टिकून राहा समाजात।। 


हीन तुला समजणाऱ्यांना

दाखव आता नारीजात

सामर्थ्य कळू दे षंढांना

अस्तित्व निर्माण कर जगात।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy