मुखवटा
मुखवटा
घरी आजवर जरी माझ्या सुखे नांदून गेली
सण दुःखाचे आता, आपण साजिरे करू
जुन्या वाटी तुझ्यासाठी, किती थांबायचे आता
चाल आयुष्याची पुन्हा, मार्गी नव्याने करू
अश्रूंत या वाहत्या वाट दिसणार नाही
हाती दोन काजवे, तरीही उगाच धरू
ठाऊक नाही मनाला, मी कोण येथे
ओळख थोडी स्वतः ची, थोडी नव्याने करू
आठवणींची वाट मोठी, चालून सरेल थोडी
थोपवून भावनांना, सांत्वन स्वतःचे करू
गीत तेच पूर्वीचे, येईल नव्याने ओठी
एकेक अंतऱ्याचा, एकेक श्वास करू
वेदना जीवाला आता, जरी असह्य झाल्या
मुखवटा गोड हास्याचा, जरा मुखावर धरू