STORYMIRROR

Sanjay Gurav

Tragedy

3  

Sanjay Gurav

Tragedy

उध्वस्त..

उध्वस्त..

1 min
77

एका वळीवाणं उध्वस्त होऊनही

वाट पाहतेय आजही पावसाची

वळीव वागायचाच उद्धटासारखा

म्हणून का साथ सुटावी..मृगाची.?


आता सर फक्त खिडकीतून पाहते

बसल्या जागीच ती सचैल नाहते

एकटीच मनभरुन थेंबांशी बोलते

आलेच चार थेंब तर हातावर झेलते.


पाऊस सखा झाला पण सख्खा सुटला

सुरू व्हायच्या आधीच संवाद खुंटला

पावसाच्या थेंबाशी स्नेह असा जुळला

वेल्हाळ पाऊस तोही तिच्यावर भाळला.


नाही पडली जर कानी रिपरिप पावसाची

घडीच विस्कटते मग तिच्या दिवसाची.

चार मासांची लाभते अशी जोड पावसाची

पुन्हा डोळ्यात दाटून येते ओढ पावसाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy