STORYMIRROR

oh bhai

Tragedy Others

3  

oh bhai

Tragedy Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
15

सांग पावसा 

तुझ्यावर लिहावं तरी काय 

पण काही लिहिल्यावाचून, 

कवीने राहावं तरी काय 


तू ओठांवरती आणतोस, 

भावनांची साठवण

तू घेऊन येतो सोबत 

गोड गुलाबी आठवण 


तुझ्या बरसत्या धारेने 

इथे सुखावतो कोणी, 

तुझ्यामुळेच कोणाच्या 

डोळ्यात येते पाणी

 

शेतकरी कष्टकऱ्यांची

तूच खरी आस असतो, 

तूच रुसला म्हणजे 

त्यांच्या गळ्यात फास असतो 


तुझ्याबद्दल काय सांगू 

शब्द अपुरे पडतात मला

पण कवितेतून कवीची, 

पावसा एकच विनंती तुला

 

कधी बरसलाच नाही 

तू एवढं बरसून घ्यावं, 

या देशातील मातीला 

जातीसोबत वाहून न्यावं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy