शिक्षण
शिक्षण


गल्लोगल्ली शाळा झाल्या
शिक्षण झाले महाग
ऑनलाईनने संपवला
बुद्धिचा खुराक।।
वरदेखणं रूप शाळेचं
पाहून भुलला पालक
त-हेत-हेच्या क्लासेसने
दबून गेला बालक।।
पैसे भरून ज्ञान मिळते
म्हणून लावली ट्यूशन
ट्यूशनला जाण्याची
सगळीकडेच फॅशन।।
शिक्षणाने पिढी घडावी
पण तयार होत आहेत यंत्र
कधी बदलणार दृष्टीकोन
कधी सुधारेल तंत्र।।