निवृत्ती
निवृत्ती
पाहता पाहता
दिवसा मागुन दिवस
सरत गेले
वयाने एक धप्पा दिला
कधी आली निवृत्ती
कळलेही नाही
खूप धडपडले
नोकरीत
आणि संसारात ही
आता जगावे थोडे स्वप्नवत
वाटते व्हावे
तरल तरल
उंच उडावे
नील अंबरी
त्या पतंगी सम
चमकत राहावे
तारकां सवे
चंद्राचे करावे आसन
त्या वर झुलावे
मन भरून
काय करावे?
तदनंतर
हिरव्या रानी
खूप बागडावे
पाऊस धारा
झेलत अंगावर
मोरा संगे खूप थीरकावे
कोकिळेचे ऐकुनी गुंजन
सुर धरावा मंजुळ
हेच असावे
स्वप्नवत
स्वप्नवत
स्वप्नवत
