माती, मेकअप आणि मम्मी
माती, मेकअप आणि मम्मी
जन्मल्या तिच्या पोटी
दोन कन्या, देवाचे देणे
दूजाभाव नाही कधी,
केले अपार कष्ट
नाही उणीव काही
संस्कार, शिक्षण भरभरून .
एकीस आवडे मेकअप
तर दुसरीस माती
चढाओढ नाही कधी
क्षेत्र दोघींचे विभिन्न
पण कलागुण विलक्षण
एक करी पदन्यास,नर्तन
खिळवून ठेवी प्रेक्षक अपार
दुसरी चा सीमेपार चौकार
मातेस आणखी काय हवे
नयनातून आनंद अश्रू झरे
