ती
ती
तिच्याशिवाय घर सूने सुने
हो ,ती नसेल तर सारेच उणे
कधी कन्या, बहीण कधी
कधी ती असते आई,मावशी.
सासू का असेना,
तिचे अस्तित्व जरा निराळेच
घरात असेल वावर तिचा
मग पहा घराचा नकाशा
टापटीप पणा अन सजावट
आहे त्यात बनवते ती घराला स्वर्ग
पाहुणे आले की तिचीच लगबग
चार घास गोड धोड बनवणारच
तर ती ही अशी साऱ्यांच्या
मनात घर करणारी
पण ती मात्र स्व घरासाठी
सतत झटणारी.
