जननी -उत्सवाची
जननी -उत्सवाची
रंगात रंगून जाते
स्वप्नात दंग ती होते
स्रीत्वा ची आहे कहानी
उत्सवाची ती तर महाराणी
चैतन्य उसळे तन मना त
आनंद पसरे भवताली
राजस लोभस रूप तिचे
नवरंगात ती मोहरते
जागर करते शक्तीचा
पा झर फुटे मायेचा
डोळ्यात असे चमक अनोखी
नवरात्र उत्सवाची ती हो जननी
