पुन्हा यावे ते दिवस!
पुन्हा यावे ते दिवस!


मन सांगा का बोलावते पुन्हा पुन्हा
त्या सुंदर दिवसांना
आनंदच होता, नव्हती चिंता मुळी लोकांना
स्वैर विहरतांना
रात्र अन् दिवस ही किती छान असायचे
कसलेच बंधन कुणा नसायचे
क्षण सौख्याचे कसे सरायचे
कुणा न कळायचे
काम धंदा सर्वांचाच चालू होता
नव्हती उपासमार
प्रत्येक जण खावून पिवून सुखी होता
आनंदात होता फार
आता मात्र बदलली आहे परिस्थिती
कोरोनाची आहे सर्वत्र भिती
संक्रमण पसरण्याची भयंकर धास्ती
लाॅकडाउनची ही स्थिती
बंधनात अडकलोय आपण सर्व जण
प्रत्येक स्तरावर आहे अडचण
जगभरात झालेय कोरोनाचे आक्रमण
रोखावेच लागेल हे संक्रमण
आणावेच लागतील पुन्हा पूर्वीचे दिवस
आनंद अन् उल्हास
कोरोनाला हद्दपार करून,संपवू त्रास
अन् घेवू शुद्ध मोकळा श्वास