STORYMIRROR

Prashant Kadam

Romance Fantasy

4  

Prashant Kadam

Romance Fantasy

काही तरी घडून गेलय खास !!

काही तरी घडून गेलय खास !!

1 min
363

काय मी सांगू ? कुणाला सांगू ?

कसे करमेना, जाईना ध्यास

काही तरी घडून गेलय खास 


अचानक मोहरले, माझे गाल

अवचित फुलले गुलाबी फुल 

गुलदस्त्याचा, त्या फुलांचा

म॔द सुगंध, लागलाय अंगास

काही तरी घडून गेलय खास 


असूनही अबोल, बोलले नीट

चकीतच केले, बनले मनमीत

सुशील घरातील, लेक अशी मी

सहज वागणे, दिसले त्यांस

काही तरी घडून गेलय खास 


मनातले खोल, वदले मी

सर्वच सांगूनी, फसले मी

राज रूपावर, अशी भाळली

गोड रूप ते, आवडले मनास

काही तरी घडून गेलय खास 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance