सर सलामत तो पगडी पचास
सर सलामत तो पगडी पचास


खबरदार जर मास्क काढूनी फिरलात रस्त्यावर
अती शहाणे बनून का होता उदार जीवावर ?
ठावूक नसे का तूम्हास कोरोनाचे संकट भयंकर
लगाम ठेवा वर्तणुकीवर नका बनू हलगर्जी बर
असलात जरी धडधाकट तरी आपटाल पाठीवर
कळणार ही नाही येईल कधी विषाणूचा तो ज्वर
नाहक अडकून मग स्वतःस न्याल मृत्युशय्येवर
नका समजू तूम्ही स्वतःस हिरो शहाणे व्हा सत्वर
नियम पाळा घालून दिलेत जे सरकारने खरोखर
रहा सुरक्षित स्वतः अन् ठेवा समाजाला बरोबर
सर्व नियम पाळून तुम्ही मात करा दुष्ट कोरोनावर
'सर सलामत तो पगडी पचास' हे कोरा मनावर