का करावी?
का करावी?


मस्करी ही भावनांची का करावी?
मानहानी माणसांची का करावी?
नित्य सन्मानित करावे माणसांना
काळजी मग वर्तनाची का करावी?
कास आता देश भक्तीची धरावी
घट्ट मैत्री दुष्मनांची का करावी?
रक्षणे त्या जंगलांना ध्येय असता
वृक्ष तोडी जंगलांची का करावी?
नेत नाही सोबतीने कोण काही
काळजी तर जिंदगीची का करावी?