STORYMIRROR

Prashant Kadam

Tragedy Others

3  

Prashant Kadam

Tragedy Others

आता तरी कोरोनाला रोकशील का!

आता तरी कोरोनाला रोकशील का!

1 min
242

देवा आता तरी कोरोनाला रोकशील का 

लाॅकडाउन म्हणत्यात ते थांबवशील का


वर्ष होवून गेले, आहेत व्यवसाय सर्व बंद 

घरांत नाही शिल्लक पैसा करू काय सांग


बसून बसून घरात आळस भरलाय अंगी

होते ते संपले आता टाकली आम्ही नांगी


खाणारी माणस सात बसलीत गप घरात

कुत्री मांजरं ही रेंगाळताहेत उपाशी दारात 


बाहेर पडलो आम्ही तर कोरोनाची भिती

घरी असे थांबल्याने उपासमारीची स्थिती


संकट दूर कर देवा व्यवस्थित होवू दे सर्व

कामधंदा दे सर्वांना हे संपव कोरोनाचे पर्व 


देवा विनंती आम्हा पामरांची समजून तू घे

अपराध मानवाचे माफ करून अभय ही दे


देवा आता तरी कोरोनाला रोकशील का 

लाॅकडाऊन म्हणत्यात ते थांबवशील का


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy