रक्षाबंधन...
रक्षाबंधन...


मायेचे रे
हे बंधन...
प्रेमाचे रे
हे स्पंदन...
धाग्यात रे
बांधलेले...
भावनांनी
सांधलेले...
हसते रे
सुखामध्ये...
साथ देते
दु:खामध्ये...
बहिणीचा
भाऊराया...
जणू काही
पितृछाया...
भावाची रे
ती भगिनी...
भासे सदा
रे रागिणी...
मायेपरि
तीच ताई...
बनते रे
कधी आई...
रक्षणार्थ
सरलेला...
भाऊराया
ठरलेला...
द्रौपदीचा
जसा कृष्णा...
आयुष्याची
प्रेम तृष्णा...
खुदकन
हसविते...
टचकन
रडविते...
सुंदर हे
असे नाते...
साऱ्यांनाच
मोहविते...!