जाणीव
जाणीव


जाणीव झाली मला त्या सुखद भावनांची...
ज्यांनी साद घातली मनाला सोनेरी क्षणांची...
जाणीव झाली मला त्या निखळ मैत्रबंधनाची...
ज्यांनी गुंफली माळ तुझ्या माझ्या मनाची...
जाणीव झाली मला त्या मधुर स्वराची...
ज्याने वाजवली बासरी अतरंगी या प्रेमाची...
जाणीव झाली मला त्या बोलक्या नयनांची...
ज्यांनी क्षणात जाणलं मी सखी तुझ्या जीवनाची...
जाणीव झाली मला हळव्या त्या व्यथांची...
ज्यांनी उलगडली कथा खांद्यावरील आधाराच्या हातांची...
जाणीव झाली मला त्या निखळ स्पर्शाची...
ज्यांनी फुलवली मन-अंगणी बाग नव्या हर्षाची..
जाणीव झाली मला त्या अनोळखी नात्याची...
ज्याने संवाद साधला असा जणू ओळख ही जन्मांतरीची...
जाणीव झाली मला त्या साऱ्याच शब्दांची ज्यांनी लिहिले माझे आयुष्य सांगड घालून त्या नि:शब्दांची...
जाणीव झाली खऱ्या अर्थाने मला तुझी अन् तुला माझी जाणवू लागले हे पुन्हा नव्याने....!!