STORYMIRROR

vivek mokal

Tragedy

4  

vivek mokal

Tragedy

दुःखाचे कवडसे

दुःखाचे कवडसे

1 min
13.3K


सुन्नसुन्न झालेल्या मनात

दुःखाचे कवडसे दाटले,

विछिन्न झालेले ते भाव

आसवांनी शब्दात मांडले...


प्रेमाचे ठसे विरळ होऊन

खोरे मनाचे दूषित झाले,

अन चांगल्या आचरणाचे

विचारच सारे नष्ट पावले...


प्रेमाची अमूल्य भेट म्हणून

विरहास जीवापाड जपले,

मात्र विरहाच्या रुद्ररूपाने

काळजाला चिरून काढले...


तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत

आता डोळेही हे शिणले,

म्हणून विणलेल्या जखमेचे

हारेक टाकेही नव्याने उसवले....



ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Tragedy