आहे का शक्य..?
आहे का शक्य..?
कविता लिहिणे खूप सोपे आहे हो
पण त्याच कवितेत काळजाचा आर्त
उतरवणे सहजासहजी इथे कोठे शक्य..?
एखाद्याच्या भावना मांडणे सोपे हो
पण त्याच त्याने भोगलेल्या भावना
स्वतः भोगून कविता लिहिणे कोठे शक्य..?
कोणी बळीची कहाणी मांडतो तर कोणी
या नागड्या समाजापुढे विद्राहो पुकारतो,
पण त्याच्या कहाणीने दुःखाला त्याचा
परतीची वाट भेटणे खरेच आहे का शक्य..?
अश्या ना ना अनेक विचारांचा घनदाट विळखा
रोज रात्रीच्या या संथ अंधारात मनाला गुंतवतो,
तेव्हा हाच गुंता सोडवून या भयंकर काळोखातून
प्रकाशाकडे जाणे होते का ओ खरंच इथे शक्य..?
शक्य अशक्य असं काहीही नाही असं बोलतात
मग अशक्याची आणि शक्याची खरी व्याख्या
मांडणे या लोकांपुढे होईल का खरंच इथे शक्य..?
