स्वार्थाच्या दरी
स्वार्थाच्या दरी


बेमतलबी स्वार्थाच्या खोल दरीत कोसळून
आजकाल सारीच नाती-गोती कुजू लागली,
सुसभ्यतेच्या या वागणुकीला नाहक जाळून
जणू आज माणुसकीला काळिमाच फासली,
इथे बापच करतो पोटच्या गोळ्यावर अत्याचार
म्हणून प्रत्येक स्त्री स्त्री जन्मच घेयाला रुसली,
मंदिराच्या दगडाला लाखों रुपयांची ओवाळणी
मात्र जिवंत असूनही वाट्याला दुःखाची किंचाळी..