STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

4  

Prashant Shinde

Tragedy

आज...

आज...

1 min
1.0K


आज ...!


सूर्योदय पहावा वाटलं नाही

सर्यानेही सप्तरंगी दुकान थाटल नाही

शहिदांच्या जाण्याने मलाही

उत्साहात येणे झाले नाही...


म्हंटल जवानांनी घात आपल्या

मातृभूमीसाठी हसतच स्वीकारला

पण जाता जाता त्रिकाल कोठेही

तिरंग्याला सांभाळण्याचा वसा पाळला..


असोत जिवंत अथवा मृत

हृदय देशासाठी धडधडले

भले मग धड चिंधड्या चिंधड्या

होऊन हवेत उडले...


हुंकार देश प्रेमाचा चिरंजीव

साऱ्या आसमंतात पसरला

शहिदांच्या बलिदानाने जणू

भूमातेस अभिषेक सेवेचा झाला...


असे कसे घडले दुर्दैव हे सारे

तरी शाहिद होउनी इतुकेच सांगतो

म्हणे प्रत्येक शहीद जाता जाता

भार सारा तुम्हा बांधवांनो देऊनी जातो....


सांभाळ करा भूमातेचा

प्राणांची आहुती हसत हसत देऊन

पुन्हा जन्म घेऊ आम्ही इथे

जातो मातृभूमीची शपथ घेऊन...


अश्रु आवरा निडर बना

हाच एक मनी विचार असे

उज्वल उन्नत मातृभूमीचे

म्हणे मज जाता जाता स्वप्न दिसे....!


शाहीदांचे चरणी भावपूर्ण श्रद्धांजली



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy